मुंबई – राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरला असून या विस्तारामध्ये अनेक मंत्र्यांची खूर्जी जाणार असल्याची चर्चा असल्याचं बोललं जात आहे. 12 किंवा13 ऑक्टोबरला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.हा देवेंद्र फडणवीस सरकारचा शेवटचा मंत्रिमंडळ विस्तार असून या विस्तारात कोणाला संधी मिळणार आणि कोणाला डच्चू दिला जाणार याबाबतची उत्सुकता लागली आहे.
सध्या मंत्रिमंडळात भाजप कोट्याच्या चार जागा खाली आहेत. तर शिवसेनेच्या कोट्यातल्या सर्व जागा भरलेल्या आहेत. मात्र शिवसेनेच्या कोट्यातले आरोग्यमंत्री दीपक सावंत यांची विधान परिषदेची मुदत संपत आहे. त्यामुळं शिवसेनेकडे एक जागा राहणार असल्याचं दिसत आहे. त्यामुळे याठिकाणी कुणाची वर्णी लागते हे मात्र अजून गुलदस्त्यातच आहे.
यांची खुर्ची धोक्यात?
सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले
गृहराज्यमंत्री रणजित पाटील
उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे
आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा
यांना मिळणार संधी ?
आमदार आशीष शेलार
आमदार संजय कुंटे
आमदार अनिल बोंडे
आमदार भाई गिरकर
दरम्यान विष्णू सावरा आणि राजकुमार बडोले यांच्या कामगिरीवर मुख्यमंत्री फारसे खूष नाहीत असं बोललं जात आहे. तर रणजित पाटील आणि प्रविण पोटे यांना पक्षकार्यात मोठी जबाबदारी देण्यात येण्याची शक्यता आहे.
COMMENTS