राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरला, ‘या’ दिवशी होणार विस्तार ?

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरला, ‘या’ दिवशी होणार विस्तार ?

मुंबई – राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची गेली अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. त्यामुळे मंत्रीमंडाळाचा विस्तार केंव्हा होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. परंतु मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. येत्या 14 जूनला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती आहे. विधानसभेच्या अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी माहिती भाजप मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली होती. त्यामुळे येत्या 14 जूनला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी चर्चा आहे. त्यामुळे नव्या मंत्रिमंडळात आता कुणा-कुणाची वर्णी लागणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मंत्रिमंडळात यांना संधी मिळणार ?

या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचे सहा आणि शिवसेनेचा एक मंत्री शपथ घेणार आहेत. भाजप नेते आशिष शेलार यांनाही विस्तारात स्थान मिळणार असल्याचं म्हटलं जातं. औरंगाबादचे भाजप आमदार अतुल सावे किंवा प्रशांत बंब यांनाही मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते. बुलडाण्यातील जळगाव-जामोदचे भाजप आमदार संजय कुटे यांनाही मंत्रिपदाची लॉटरी लागणार असल्याचा अंदाज आहे. तर राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या जयदत्त क्षीरसागरांना शिवसेनेच्या कोट्यातून आरोग्यमंत्रीपद मिळू शकतं असं बोललं जात आहे. तसेच काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर भाजप प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह सहा जणांचा शपथविधी होणार असल्याची चर्चा आहे, तर शिवसेनेची एकाच वाढीव मंत्रिपदावर बोळवण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
त्यामुळे या विस्तारात कोणाला संधी मिळणार याकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS