27, 28 डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार, या नेत्यांच्या गळ्यात पडणार मंत्रिपदाची माळ?

27, 28 डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार, या नेत्यांच्या गळ्यात पडणार मंत्रिपदाची माळ?

मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांच्यात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आज बैठक पार पडली. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली आहे. या बैठकीदरम्यान 27, 28 डिसेंबर दरम्यान मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याबाबत चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या विस्तारादरम्यान
कोणत्या नेत्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार याबाबत चर्चा सुरु झाली आहे.

उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात शिवसेनेच्या कुणाकुणाची वर्णी लागते, याचीही चर्चा रंगली आहे. शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांमध्ये रविंद्र वायकर, उदय सामंत, गुलाबराव पाटील, तानाजी सावंत, आशिष जैस्वाल, संजय राठोड, दादा भुसे, दिवाकर रावते, अनिल परब, डॉ. राहुल पाटील, संजय शिरसाट, अनिल बाबर आणि शंभूराज देसाई-पाटण यांचा समावेश आहे.

राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांमध्ये अजित पवार, दिलीप वळसे पाटील, नवाब मलिक, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, हसन मश्रीफ, अनिल देशमुख, राजेंद्र शिंगणे, बाळासाहेब पाटील, सरोज अहिरे आणि डॉ. किरण लहामटे यांच्या नावाचा समावेश आहे.

तसेच काँग्रेस मंत्र्यांची अंतिम यादी नवी दिल्लीत निश्चित होते आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, यांच्यासह विजय वडेट्टीवार, के सी पाडवी, अमित देशमुख, सतेज पाटील, विश्वजित कदम, यशोमती ठाकूर, सुनील केदार, वर्षा गायकवाड, अमिन पटेल आणि प्रणिती शिंदे यांचा संभाव्य मंत्र्यांमध्ये समावेश आहे.

COMMENTS