काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावर ‘या’ नेत्याचं नाव निश्चित?

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावर ‘या’ नेत्याचं नाव निश्चित?

मुंबई – लोकसभा निवडणुकीत राज्यासह देशात काँग्रेसला मोठा फटका बसला. त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी आपला राजीनामा सोपवला. अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा होता. त्यानंतर आता त्यांच्या जागी काँग्रे़सचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना संधी मिळणार असल्याची माहिती आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी थोरात यांची वर्णी लागण्याची चिन्हं आहेत. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा केली जाणार आहे. थोरातांसोबतच तीन ते़ चार नेत्यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान अहमदनगरमध्ये विखेंचे प्रतिस्पर्धी म्हणून थोरातांची ओळख आहे. ते 2009 मध्ये अहमदनगरमधील संगमनेर मतदारसंघातून आमदार झाले होते. राज्यात त्यांनी कृषी आणि महसूल मंत्रिपदाची धुरा सांभाळली होती. थोरातांनी संगमनेरमध्ये अनेक सहकारी शिक्षणसंस्था स्थापन केल्या आहेत. दूध सहकार चळवळीचे ते अग्रणी नेते मानले जातात. त्यामुळे त्याच्यावर पक्षाने आता आणखी एक नवी जबाबदारी सोपवली आहे.

COMMENTS