बेळगाव – कर्नाटक निवडणुकीतील संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या मराठी बहुल बेळगाव जिल्ह्यात महाराष्ट्र एकीकरण समितीला एकही जागा मिळवता आली नाही. जिल्ह्यातील १८ पैकी १० जागांवर काँग्रेसला तर ८ जागी भाजपला विजय मिळाला आहे. तसेच समितीला पूर्वीच्या दोन्ही जागा गमवाव्या लागल्या आहेत. महाराष्ट्र एकिकरण समितीतील दुफळीमुळे समितीचे नेतृत्व मतदारांनी नाकारल्याचे चित्र या निवडणुकीतून स्पष्ट झाले आहे. मराठी माणसांतील दुहीच या पराभवास जबाबदार असल्याचे बोललं जात आहे.
दरम्यान महाराष्ट्र एकीकरण समितीचे खानापूर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार अरविंद पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. निवडणुकीपूर्वी प्रयत्न होऊनही महाराष्ट्र एकीकरण समितीतील गटांमध्ये एकी झाली नाही. नेत्यांनी जनतेच्या मनातील एकीची इच्छा पूर्ण केली नाही त्यामुळेच जनतेने समितीच्या उमेदवारांना नाकारल्याचे बोलले जात आहे. या निवडणुकीत उभी फूट पडल्याने मतदारांची फाटाफूट झाली असून त्याचा जोरदार फटका या निवडणुकीत समितीला बसला आहे.
COMMENTS