राज्यात 28 फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊन

राज्यात 28 फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊन

मुंबई : राज्यातील लॉकडाऊन 31जानेवारी 2021 पर्यंत वाढवण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला होता. आता कोरोना स्थिती नियंत्रणात असली तरी कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या ठाकरे सरकारकडून आज शुक्रवारी लॉकडाऊन वाढविण्याबाबत आदेश जारी केला आहे. आता हा लॉकडाऊन 28 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे.

कोरोनाच्या फैलावामुळे महाराष्ट्रात 31 जानेवारी 2021 पर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला होता. राज्यातील कंटेन्मेंट झोनमध्ये हा लॉकडाऊन असणार कायम असणार आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात असला तरी कोविड-१९ रुग्णांचा आकडा पुन्हा वाढ आहेत. तसेच ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडल्याने खबरदारी घेण्यात येत आहे. सध्या राज्य सरकारने बंद असलेल्या शाळा सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्याचवेळी कोरोनाचा धोका नको म्हणून पुन्हा लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यात कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका वाढत असल्यामुळे ठाकरे सरकारने लॉकडाऊन वाढविण्याचा हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, मुंबईतील लोकल सेवा सुरु करण्याबाबत काही संकेत देण्यात आलेले नाही.

COMMENTS