मुंबई – चंद्रपूर, खापरखेडा, परळी, नाशिक, भुसावळ येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात कोळशाचा तुटवडा असल्यामुळे राज्यात अघोषित भारनियमन सुरू करण्यात आले आहे. जवळपास 3000 मेगावॅट विजेचा तुटवडा असल्यामुळे हे भारनियमन सुरु करण्यात आलं असल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला भारनियमनाचा चांगलाच फटका बसणार असल्याचं दिसत आहे.
दरम्यान तात्पुरत्या स्वरूपाचं भारनियमन लागू करण्याचा निर्णय महावीतरणनं घेतला आहे G1, G2 आणि G3 या तीन गटात 3 ते 4 तासांचं भारनियमन लागू करण्यात आलं आहे. औरंगाबाद, कोल्हापूर, बीड, परळी, मुंब्रा, भिवंडी, नाशिक या परिसरात लोडशेडींग करण्यात येत आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांना भारनियमनाचा मोठा सामना करावा लागणार आहे. तसेच ऑक्टोबर हिट, कृषी पंप उपसा आणि सणासुदीमुळे विजेच्या मागणीत वाढ होत असतानाच अघोषित भारनियमन सुरु करण्यात आल्यामुळे राज्यातील जनतेनं निराशा व्यक्त केली आहे.
COMMENTS