महाराष्ट्रातील एका मंत्र्याची बोगस ‘पीएचडी’, केंद्रीय मंत्र्याचा गौप्यस्फोट !

महाराष्ट्रातील एका मंत्र्याची बोगस ‘पीएचडी’, केंद्रीय मंत्र्याचा गौप्यस्फोट !

नवी दिल्ली –  महाराष्ट्रातील एका मंत्र्याची बोग ‘पीएचडी’ असल्याचा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्र्यानं केला आहे. त्यामुळे भाजपच्या अडचणीत वाढ झाली असल्याचं दिसून येत आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांनी हा गौप्यस्फोट केला असून या मंत्र्याचे नाव मात्र सत्यपाल सिंह यांनी सांगितलं नाही. त्यामुळे हा बोगस डीग्रीवाला मंत्री नेमका कोण यावरच सध्या राज्यभरात चर्चा सुरु आहे. तसेच या मंत्र्यानं ज्या विद्यापीठातून ही पदवी घेतली आहे. त्याचं नावही आपण सांगणार नसल्याचं सत्यपाल सिंह यांनी म्हटलं आहे. त्यामुळे या मंत्र्याचं नाव आणि ते बोगस डिग्री देणा-या विद्यापीठाचं नाव सध्या तरी गुलदस्त्यात असल्याचं दिसत आहे. पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्यावतीने आंध्रप्रदेशातील तिरुपती आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ ‘फर्ग्युसन सेंटर फॉर हायर लर्निंग’ या संस्थेचे उद्घान सोहळ्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

दरम्यान या मंत्र्याचा दबाव असल्याने आपण पीएचडीला मान्यता दिली असल्याचे विद्यापीठाच्या संबंधीत विभागप्रमुखांनीही आपल्याला सांगितले असल्याचं सत्यपाल सिंह यांनी म्हटले आहे. तसेच काही लोकांना पीएचडी शब्दाचा अर्थही माहिती नसणारे आणि संबंधीत विषयाचे पुरेसे ज्ञान नसतानाही ते पीएचडी घेऊन बसले आहेत. महाराष्ट्रातल्या एका मंत्र्यानेही अशीच बोगस पीएचडी घेतली असून त्याने स्वतः मला ही माहिती दिली असल्याचं सत्यपाल सिंह यांनी म्हटलं आहे. तसेच आपलं नावच सत्यपाल असल्यामुळे मी नेहमीच सत्य बोलत असतो असंही त्यांनी म्हटलं आहे.

COMMENTS