“लॉकडाउनमुळे प्रभावित झालेल्या ऑटो,टॅक्सी,टेम्पो आणि ट्रक चालकांना आर्थिक मदत द्या !”

“लॉकडाउनमुळे प्रभावित झालेल्या ऑटो,टॅक्सी,टेम्पो आणि ट्रक चालकांना आर्थिक मदत द्या !”

मुंबई – लॉकडाउनमुळे प्रभावित झालेल्या राज्यातील ऑटो,टॅक्सी,टेम्पो,ट्रक चालकांना आर्थिक मदत मिळावी अशी मागणी महाराष्ट्र यशवंत सेनेनं मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांना पत्र लिहिले आहे. बांधकाम कामगारांप्रमाणे ऑटो, टॅक्सी, टेम्पो, ट्रक चालकांना मदत द्या अशी मागणी करण्यात आली आहे.

महाराष्ट्र यशवंत सेनेचं पत्र

आदरणीय उद्धवजी,

जय महाराष्ट्र…

उपरोक्त विषयास अनुसरून आपणास सांगू इच्छितो की कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉक डाउन मुळे विविध उद्योग व्यवसाय प्रभावित झाले आहेत.सध्या लॉक डाउन गरजेचा आहे याबाबत कोणाचे ही दुमत नाही आपण करत असलेले प्रयत्न या बद्दल आम्हा सर्वांनाच आपला अभिमान वाटतोय आपण करत असलेल्या सूचनांचे वेळोवेळी आम्ही पालन करत आहोत.

अस असल तरी हातावर पोट असणारे महाराष्ट्रातील लाखो ऑटो,टॅक्सी,टेम्पो आणि ट्रक चालकांसमोर या लॉक डाउन कालावधी मध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.लॉक डाउन चा कालावधी संपल्या नंतर प्रत्येका समोर गाडीचा हफ्ता,विमा पॉलिसी,नूतनीकरण,मुलांच्या शाळेचा खर्च ते घर चालवण्या पर्यंत अनेक गोष्टी आ वासून उभ्या आहेत.

त्यामुळेच ज्या पद्धतीने आपण नोंदणीकृत बांधकाम कामगारांना मदत केली त्याच धर्तीवर या ऑटो,टॅक्सी,टेम्पो आणि ट्रक चालकांना ही आर्थिक मदत घोषित करावी अशी आपणास नम्र विनंती.आपण आमच्या या मागणीचा सकारात्मक विचार कराल अशी अपेक्षा आहे.धन्यवाद.

आपला,

राजू झंजे
प्रमुख
महाराष्ट्र यशवंत सेना.

COMMENTS