मुंबई – पश्चिम महाराष्ट्रातील तीनशे ते साडे तीनशे गलाई(सुवर्णकार)कामगार लॉकडाउनमुळे राजस्थान इथल्या जोधपूर इथे अडकले आहेत. यातील अनेकांसोबत त्यांची मूल आणि कुटूंब देखील आहेत. गेल्या दीड महिन्यापासून लॉकडाउन असल्यामुळे या सगळ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे राजस्थान इथल्या कोटामधून ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणण्यात आले त्याच पद्धतीने यांना ही महाराष्ट्रात आणावे अशी विनंती महाराष्ट्र यशवंत सेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
#राजस्थान_इथे_अडकलेल्या_गलई_कामगारांना महाराष्ट्रात आणण्याबाबत महाराष्ट्र यशवंत सेनेचे #मुख्यमंत्री_उद्धवजी_ठाकरे यांना पत्र…@CMOMaharashtra @OfficeofUT @SenaYashwant pic.twitter.com/2rPuoXRi6z
— Maharashtra Yashwant Sena official (@SenaYashwant) May 11, 2020
दरम्यान सातारा,सांगली या जिल्ह्यातील सर्वाधिक कारागीर या ठिकाणी अडकले आहेत.या सर्वांना महाराष्ट्रात आणले जावे यासाठी महाराष्ट्र यशवंत सेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहले आहे. या गलाई कामगारांना मदत करण्याची विनंती केली आहे.
COMMENTS