मुंबई – राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. त्यानंतर महानगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीतही महाविकास आघाडी एकत्रित येवून सरकार स्थापन करणार असल्याची चर्चा आहे. परंतु
सावंतवाडीतील नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मात्र महाविकास आघाडीमध्ये फूट पडली असल्याची चर्चा आहे. कारण महाविकास आघाडीमधील नेत्यांची बैठक होण्याआधीच काँग्रेस नेत्यानं आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारीवर तिन्ही पक्षांच्या वरीष्ठ नेत्यांचे एकमत झाले. पण या नेत्यांच्या बैठकीआधी काँग्रेसच्या दिलीप नार्वेकरानीया पक्षाचा एबी फॉर्म देण्यात आलेला होता.
या फॉर्मबाबत आपल्याला पक्षाकडून काहीही कल्पना न देता तो नार्वेकराना परस्पर देण्यात आला असल्याचा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी केला आहे. तसंच पक्षाचा एबी फॉर्म जरी दिला असला तरीही पक्षाने उमेदवारी मागे घेण्यास सांगितल्यानंतर नार्वेकरानी आपली उमेदवारी मागे घेणे आवश्यक होते, परंतु आपली उमेदवारी त्यांनी कायम ठेवली आहे.
दरम्यान नार्वेकर यांनी
उमेदवारी अर्ज भरल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांची स्वाक्षरी असलेले शुभेच्छापत्र व्हायरल केले आहे. परंतु नार्वेकर यांनी व्हायरल केलेले बाळासाहेब थोरात यांचे पत्र संशयास्पद असल्याचा दावा जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी केला आहे. त्यामुळे नार्वेकरांच्या उमेदवारीवर आता काँग्रेस काय निर्णय घेणार हे पाहण गरजेचं आहे.
येत्या 29 डिसेंबरला सावंतवाडी नगराध्यक्षपदाची निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे याठिकाणी चांगलच राजकीय वातावरण तापलं असल्याचं दिसत आहे.
COMMENTS