मुंबई – भाजपचं सरकार कोसळल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार राज्यात स्थापन होत आहे. महाविकास आघाडीचे नेते आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उद्या (28 नोव्हेंबर) मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात कोण असेल अशी चर्चा सुरू झाली आहे. महाविकास आघाडीच्या मंत्रिपदाच्या वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. शिवसेनेला 16 मंत्रिपद, राष्ट्रवादीला 15 आणि काँग्रेसला 12 मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात नेमका कुणाचा समावेश होणार याविषयी चर्चा सुरू आहे.
महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात शिवसेनेकडून एकनाथ खडसे, दिवाकर रावते, रामदास कदम, तानाजी सावंत, दीपक केसरकर, सुभाष देसाई, अब्दुल सत्तार आणि गुलाबराव पाटील तर राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख, दिलीप वळसे-पाटील, मकरंद पाटील आणि राजेश टोपे हे मंत्रिपदाची शपथ घेतील अशी माहिती आहे. तर काँग्रेसकडून अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, विश्वजित कदम, यशोमती ठाकूर, सतेज पाटील, विजय वडेट्टीवार, के.सी. पडवी आणि सुनील केदार हे नेते मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे.
COMMENTS