महाविकास आघाडीचा मंत्रिमंडळ विस्तार, वाचा संभाव्य यादी!

महाविकास आघाडीचा मंत्रिमंडळ विस्तार, वाचा संभाव्य यादी!

मुंबई –  महाविकास आघाडी सरकारचं खातेवाटप जाहीर झाल्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. हिवाळी अधिवेशन पार पडल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी चर्चा आहे. या मंत्रीमंडळात आमदारांचा समावेश करताना प्रादेशिक आणि सामजिक समतोल राखण्यासाठी तीन्ही पक्ष प्रयत्नशील आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला 12 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रीपदांसह एकूण 16 मंत्रिपद मिळणार आहेत. तर राष्ट्रवादीला कॅबिनेट 11 आणि 4 राज्यमंत्रीपदासह एकूण 15 अशी मंत्रिपद दिली जाणार असल्याची माहिती आहे. तसेच काँग्रेसलाही 8 कॅबीनेट आणि 4 राज्यमंत्रीपदासह एकूण 12 मंत्रिपद दिली जाणार असल्याची माहिकी आहे.

 

 

खातेवाटपात कोणत्या नेत्याकडे कोणते खातं?

 

एकनाथ शिंदे

 

गृह, नगरविकास, वने, पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, मृदा व जलसंधारण, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण

 

सुभाष देसाई

उद्योग आणि खनिकर्म, उच्च व तंत्रशिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण, कृषी, रोजगार हमी योजना, फलोत्पादन, परिवहन, मराठी भाषा आणि सांस्कृतिक कार्ये, राजशिष्टाचार, भूकंप पुनर्वसन, बंदरे आणि खारभूमी विकास

 

छगन भुजबळ

 

ग्रामविकास, जलसंपदा व लाभक्षेत्रक विकास, सामजिक न्याय व विशेष सहाय्य, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास आणि उद्योजकता, अन्न व औषध प्रशासन

 

जयंत पाटील

 

वित्त आणि नियोजन, गृहनिर्माण, सार्वजनिक आरोग्य, सहकार व पणन, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक सरंक्षण, कामगार, अल्पसंख्यांक विकास,

 

बाळासाहेब थोरात

महसूल, ऊर्जा व अपारंपारिक उर्जा, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण, पशू संवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय

 

नितीन राऊत

 

सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), आदिवासी विकास, महिला व बाल विकास, वस्त्रोद्योग, मदत व पुनर्वसन, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त, जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण

COMMENTS