अजित पवार राहणार महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थित?

अजित पवार राहणार महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थित?

मुंबई – उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अजित पवार यांच्याशी आमचा संपर्क झाल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे अजित पवारांवर राष्ट्रवादी कारवाई करणार का ? अजित पवार राजकीय सन्यास घेणार का ? अशा चर्चांना उधाण आले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर संध्याकाळी महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीत अजित पवार देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.वांद्रे येथील ट्रायडेंट हॉटेलमध्ये महाविकास आघाडीची बैठक होत आहे. तीन्ही पक्षांचे महत्त्वाचे नेते या ठिकाणी पोहोचत आहेत. यावेळी अजित पवार देखील पोहोचतील असे सांगण्यात येत आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी अवघ्या साडेचार दिवसांत आपल्या उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आम्ही स्थिर सरकार आणू आणि ५ वर्षे हे सरकार टिकेल असा विश्वास दाखवणाऱ्या भाजपला मोठा धक्का बसला आहे.

COMMENTS