मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलावली महत्त्वाची बैठक, अजित पवारांची उपस्थिती, शरद पवारही येणार !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलावली महत्त्वाची बैठक, अजित पवारांची उपस्थिती, शरद पवारही येणार !

मुंबई – दिल्लीवरुन परतल्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. वर्षा निवासस्थानी महत्त्वाची बैठक होत असून या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासही महाविकास आघाडी सरकारमधील काही नेते उपस्थिती आहेत. तर थोड्याच वेळात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान काल उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन सीएए कायद्याबाबत सकारात्मक भूमिका मांडली होती. उद्धव ठाकरे यांच्या या भूमिकेनंतर महाविकास आघाडीत मतमतांतरे होत आहेत. कारण काँग्रेसने सीएए, एनआरसी आणि एनपीए कायद्याला जाहीर विरोध दर्शवला आहे. त्यामुळे या कायद्यावरुन आघाडीतील सत्ताधारी तीनही पक्षांच्या नेत्यांमध्ये बैठकीत चर्चा होणार असल्याची शक्यता आहे.
तसेच राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनाला येत्या सोमवारपासून सुरुवात होत आहे. या अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. याबाबतही या बैठकीत चर्चा केली जाणार असल्याची माहिती आहे.

COMMENTS