मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडत आहे. या बैठकीत राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्य सरकारचे काही महत्त्वाचे निर्णय, कोरोना संबंधित उपाययोजना यावर चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याचबरोबर या बैठकीत महामडंळाच्या नियुक्त्याबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान या बैठकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार ‘वर्षा’वर उपस्थित आहेत. तर काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह काही महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आजच्या या बैठकीत आणखी काय चर्चा होणार याकडे लक्ष लागलं आहे.
COMMENTS