नवी दिल्ली – काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले असून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अहमद पटेल यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त मोठं गिफ्ट दिलं आहे. पक्षाच्या खजिनदार पदावर अहमद पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या तिजोरीच्या चाव्या आता पटेल यांच्याकडे गेल्या आहेत. गेली 20 वर्षांपासून खजिनदार पदावर असणा-या मोतीलाल व्हारो यांच्या ठिकाणी पटेल यांची नियुक्ती केली आहे. तसेच व्होरा यांच्याकडे पक्षाच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
दरम्यान याबरोबरच काँग्रेसच्या परराष्ट्र विभागाच्या प्रमुखपदावर आनंद शर्मा यांची नियुती केली आहे. तर काँग्रेस सरचिटणीस आणि इनचार्ज पदावर लुईझिन्हो फ्लेरिओ यांची नियुक्ती केली आहे. यापूर्वी हे पद सी. पी. जोशी यांच्याकडे होतं. तसेच काँग्रेसच्या माजी अध्यक्ष मीरा कुमार यांना काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या कायमस्वरुपी निमंत्रक या पदावर नियुक्ती केली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस अशोक गहलोत यांनी या नियुक्त्यांचे परिपत्रक काढून ही नावे जाहीर केली आहेत.
COMMENTS