सिंधुदुर्ग – कोकणात शिवसेनेचा नारायण राणे यांच्याशी ३६ चा आकडा आहे. राणे सेनेतून बाहेर पडल्यानंतर काॅंग्रेसमध्ये गेल्यानंतर शिवसेना आणि काॅंग्रेस असा संघर्ष पाहायला मिळत आहे. दरम्यान, राणे भाजपवासी झाले असून नुकतेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यानंतर राणे कुटुंबीय कोकणात आणखीनच सक्रिय झाले आहेत. त्यामुळे राणे कुटुंबीयांकडून शिवसेनेसमोर कडवे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. मात्र, दुसरीकडे शिवसेनेतील नेत्यांची वाढती नाराजी शिवसेनेसाठी धोक्याची घंटा आहे.
शिवसेना सत्तेत असतानाही भास्कर कदम यांना मंत्रीमंडळात सामावेश न झाल्याने ते काही महिन्यांपासून नाराज आहेत. त्यांनी गणपतीपुळे विकास आराखडा भूमिपूजन प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आमदार भास्कर जाधव यांची नाराजी स्पष्टपणे दिसून आली. काही दिवसांपूर्वीच सिंधुदुर्गातील शिवसेना नेते दीपक केसरकर यांनीही पक्षनेतृत्त्वाकडून पुरेसे लक्ष दिले जात नसल्याचे सांगत जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखविली होती.
2014च्या विधानसभा निवडणुकीत नारायण राणे यांच्यासारख्या तगड्या नेत्याचे आव्हान असताना वैभव नाईक निवडून आले होते. या विजयात अभय शिरसाट यांची महत्वाची भूमिका असल्याचे सांगितले जाते. मात्र, आता त्यांनीच पक्षाला रामराम ठोकल्याने आगामी काळात कुडाळमध्ये शिवसेनेला गळती लागण्याची शक्यता आहे.यांनी अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईत बुधवारी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव जगताप यांच्या उपस्थितीत अभय शिरसाट यांच्या पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला.
COMMENTS