मुंबई – कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे देशासह राज्यभरात सरकारकडून खबरदारी घेतली जात आहे. कोरोनाला हरवण्यासाठी पोलीस आणि डॉक्टर दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. नागरिकही सरकारच्या आवाहनाचं पालन करुन घरातच बसत आहेत. त्यामुळे काही ठिकाणी कोरोना बाधीतांचा आकडा घसरत आहे. पोलीस, आरोग्य कर्मचाय्रांसह काही राजकीय पक्षांचे कार्यकर्तेही नागरिकांच्या मदतीला धावून येत आहेत. मालाड (पश्चिम) येथील शिवसेनेचे कार्यकर्तेही एकवटले असून परिसरात कोरोनाला येऊ न देण्यासाठी ते सुरक्षाकवच बनले आहेत. परिसरातील अनेक इमारतींमध्ये सॅनीटायझर फवारणी केली जात आहे. तसेच परिसरातील नागरिकांसाठी जवळच असणाय्रा मैदानात भाजीपाला विक्री केंद्राची व्यवस्थाही करण्यात आली आहे. तसेच नागरिकांच्या इतर काही अडचणी असतील तर त्या सोडवण्यासाठीही हे शिवसैनिक तत्पर आहेत. त्यामुळे न्यू म्हाडा वसाहतीतील नागरिक निश्चिंत असल्याचं दिसून येत आहे.
या शिवसैनिकांकडून नियमांचं पालन केलं जात असून इतर नागरिकांना आपल्याकडून काही त्रास होणार नाही याचीही खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे सुख:त सदैव सोबत असलेले शिवसैनिक दुख:तही तेवढाच आधार आपल्या परिसरातील नागरिकांना देत आहे. शिवसेना विभाग क्र.2चे विभाग प्रमुख सुधाकर भाई सुर्वे व उपविभाग प्रमुख – अजित दादा भंडारी, नगरसेविका सौ. गिता भंडारी, यांच्या मार्गदर्शनाखाली शाखाप्रमुख संदीप कोळी, महिला शाखा संघटीका सौ. गिता दमाणीया, उपशाखाप्रमुख उमेश कदम कार्यालयप्रमुख अशोक साबळे, गटप्रमुख योगेश जेठवा, मनोहर विचारे, शिवसैनिक सागर गोरे, शैलेश घाडी, जयवंत निकम, विनोद मीश्रा, झगडे काका, अनिता सरदेसाई, व राष्ट्रवादीच्या अनिता म्हात्रे यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोलाची कामगिरी बजावत आहेत.
COMMENTS