पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजीनामा देऊन गुजरातला परतावं –ममता बॅनर्जी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजीनामा देऊन गुजरातला परतावं –ममता बॅनर्जी

नवी दिल्ली – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी धरणे आंदोलन मागे घेतलं आहे. हे आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी ममता बॅनर्जी यांची आज भेट घेत सर्व विरोधकांना तुमचा पाठिंबा असल्याचं सांगितलं. तसेच हे आंदोलन मागे घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं होतं. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी विरोधकांसोबत फोनवर चर्चाही केली. यानंतर ममता बॅनर्जी यांनी आंदोलन मागे घेतलं आहे.

दरम्यान केंद्र सरकारला राज्यासहित सर्व यंत्रणांवर आपलं नियंत्र ठेवायचं असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजीनामा देऊन पुन्हा गुजरातला परतावं. तिथे एक व्यक्ती एक ससकार आहे असा टोला त्यांनी लगावला. कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांना सीबीआय अटक करू शकत नाही, असं सुप्रीम कोर्टानं बजावलं आहे. पण त्याचवेळी, कुमार यांनी सीबीआयला सहकार्य करावं, असंही कोर्टानं म्हटले आहे.  त्यानंतर ‘हा आमचा नैतिक विजय असल्याचं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

COMMENTS