भाजप नेम चेंजर, गेम चेंजर नाही – ममता बॅनर्जी

भाजप नेम चेंजर, गेम चेंजर नाही – ममता बॅनर्जी

नवी दिल्ली – भाजपा हा पक्ष इतिहास बदलणारा, नावं बदलणारा, नोटा बदलणारा, संस्था बदलणारा पक्ष आहे.परंतु गेम चेंजर नसल्याची टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. तसेच भाजपाचे नेते असे वागत आहेत की त्यांच्यामुळेच देशाला स्वातंत्र्य मिळाले. पण स्वातंत्र्याची चळवळ जेव्हा सुरु होती तेव्हा भाजपाचे अस्तित्त्वही नव्हते असंही ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. तसेच भाजपमुळे देश संकटात सापडला असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सीबीआयला त्यांच्या राज्यात मज्जाव केला असून ही गोष्ट योग्यच असल्याचंही ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. तसेच आगामी निवडणुकीत भाजपाची सत्ता येणार नसून भाजपचं खरा चेहरा समोर आला असल्याची टीकाही यावेळी ममता बॅनर्जी यांनी केली आहे.

COMMENTS