मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. दक्षिण मुंबईतील पंचतारांकित हॉटेलात उद्धव ठाकरे यांच्यासह युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्यासह ममता बॅनर्जी यांची भेट झाली. या भेटीत राजकीय चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
ममता बॅनर्जी या सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. सुत्रांनी सांगितलेल्या माहितीनुसार अर्धा तास ही बैठक सुरू होती. ममता बॅनर्जी यांनी वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. तसेच त्यांनी पंतप्रधानांच्या नोटाबंदी आणि जीएसटीबाबतच्या धोरणावरही जाहीर विरोध प्रदर्शित केला आहे. शिवसेना एनडीएमध्ये सामील असली, तरी शिवसेनेच्या मुखपत्रातूनही वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यात येत असल्याने या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
COMMENTS