हातात चाकू खिशात तिरंगा, मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी व्यक्तीचा राडा ! पाहा व्हिडीओ

हातात चाकू खिशात तिरंगा, मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी व्यक्तीचा राडा ! पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली – मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी एका व्यक्तीनं दिल्लीतील केरळ भुवनमध्ये राडा केला आहे. विमल राज असे या ४६ वर्षीय व्यक्तीचे नाव असून विमल राजच्या एका हाती चाकू होता तर दुसऱ्या हाती कागदपत्रे होती. खिशात तिरंगा घेऊन तो त्याने केरळ भुवनमध्ये भुवनमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. परंतु सुरक्षा रक्षकांनी त्याला आत शिरण्यासाठी मनाई केली त्यांनी जबरदस्तीने आत जाण्याचा प्रयत्न केला. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांची भेट घेण्यासाठी हातात त्याने हा राडा केला असल्याची माहिती आहे.

 

दरम्यान विमल राज हा मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

 

COMMENTS