मुंबई – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रीय मंत्री मनेका गांधींनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं असून वनविभागाला अवनी वाघीणीच्या बछड्यांचा मृत्यू हवा असल्याचा खळबळजनक आरोप मनेका गांधी यांनी या पत्रात केला आहे. त्यामुळे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.14 नोव्हेंबर रोजी पाठवलेल्या पत्रात वन खात्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
मनेका गांधीनी काय म्हटलंय पत्रात ?
1) वनविभाग अवनी वाघीणीच्या बछड्यांना वाचवण्यासाठी काहीही प्रयत्न करत नाही
2) बछड्यांचा मृत्यू होईपर्यंत अथवा ते ठार मारले जाईपर्यंत त्यांचा शोध घेऊ नये अशा सूचना यवतमाळ वनविभागाला देण्यात आल्या आहेत.
3) 3 नोव्हेंबर रोजी अवनी वाघिणीला गोळ्या घालून ठार मारल्यानंतर आम्ही एक पथक यवतमाळला पाठवले होते.
4) वन विभागाचे स्थानिक अधिकारी बछड्यांचा शोध घेण्यासाठी कोणतेच प्रयत्न करत नसल्याचे या पथकाला आढळून आले.
5) गावकर्यांनी या पथकाला सांगितले की बछड्यांचा मृत्यू होईपर्यंत अथवा ते ठार मारले जाईपर्यंत त्यांना शोधू नये अशा सूचना स्थानिक वन अधिकाऱ्यांनी दिल्या गेल्या आहेत.
6) या बछड्यांचा शोध घेण्यासाठी बाहेरील पथक बोलवावे अशी मागणीही मनेका गांधी यांनी या पत्रात केली आहे.
COMMENTS