मी विधान परिषद उपसभापतीपदाचा राजीनामा दिला – माणिकराव ठाकरे

मी विधान परिषद उपसभापतीपदाचा राजीनामा दिला – माणिकराव ठाकरे

नागपूर – विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. विधान परिषदचे अध्यक्ष रामराजे निंबाळकर, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे आणि काँग्रेस आमदार अमर राजुरकर यांच्याकडे राजीनामा दिल्याची माहिती खुद्द माणिकराव ठाकरे यांनी दिली आहे. काँग्रेसचा उपसभापती याच अधिवेशनात निवडला जावा यासाठी राजीनामा दिल्याचं ठाकरे यांनी सांगितलं आहे. याबाबत एक ट्विटही त्यांनी केलं आहे.

माणिकराव ठाकरे यांची विधान परिषदेतील आमदारकीची मुदत येत्या 22 जुलैला संपत आहे. त्यांना पुन्हा विधान परिषदेचं तिकीट मिळालं नाही. त्यामुळे त्यांना राजीनामा देणं क्रमप्राप्त होतं. तिकीट पुन्हा न मिळाल्यानं माणिकराव ठाकरे नाराज असल्याचंही बोललं जातंय. मात्र त्यांना यवतमाळ वाशिम लोकसभा निवडणुकीचं तिकीट दिलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना लोकसभेची तयारी करण्यासाठी पक्षातर्फे सांगण्यात आल्याचंही बोलंलं जातंय.

COMMENTS