गुजरात निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसकडून डॅमेज कंट्रोल की भाजपची खेळी उलटवली ?

गुजरात निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसकडून डॅमेज कंट्रोल की भाजपची खेळी उलटवली ?

दिल्ली – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांच्या कालच्या विधानाने राजकारणात ब-याच घडामोडी घडल्या. मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रदान नरेंद्र मोदी यांच्याविषयी अत्यंत संतापजनक वक्तव्य केलं. त्यामुळे राजकारण चांगलंच तापलं. मोदी हे नीच आहेत असं वक्तव्य मणिशंकर अय्यर यांनी केलं. त्यावर भाजपनं जोरदार प्रत्युतर दिलं. पंतप्रधांनीही गुजरातची जनताच मी कसा आहे याचं उत्तर देईल असं म्हटलं. गुजरात निवडणुकीच्या तोंडावर मणिशंकर अय्यर यांनी केलेल्या या वक्तव्याचा फायदा उठवत सहानुभूती मिळवण्याचा प्रय़त्न भाजपकडून केला गेला. त्यामुळे अय्यर यांच्या वक्तव्याबाबत राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू आहे.

अय्यर यांच्या वक्तव्याचा उलट सुलट अर्थ लावण्याची कारणेही तशीच आहेत. अय्यर हे गेले काही दिवासांपासून काँग्रेसमध्ये नाराज असल्याचं बोलंलं जातंय. त्यातच त्यांनी राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदावरुन गांधी घराण्यावर निशाणा साधला होता. मग आताच मोदींनी काँग्रेसवर टीका केल्यावर अय्यर यांना पुळका का आला असा प्रश्न विचारला जात आहे ?  2014 च्या निवडणुकीच्या अगदी तोंडावर अय्यर यांनी मोदींना असंच चायवाला म्हणून हिनवलं होतं. त्याचा फायदा मोदींनी लोकसभा निवडणुकीत चांगलाच उठवला होता. अगदी तशाच प्रकारचं वक्तव्य अय्यर यांनी गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केल्यामुळे भाजपाला फायदा पोचवण्यासाठी तर त्यांनी हे वक्तव्य केलं नाही ना ? असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.

2014 मध्ये अय्यर यांच्या वक्तव्याचा फटका बसलेल्या काँग्रेसने तातडीने पावले उचलत. अय्यर यांना मोदींची माफी तर मागायला लावली आहेच. शिवाय त्यांना पक्षातूनही निलंबित करण्यात आलं आहे. पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. तसंच काँग्रेस पक्षानं असभ्य भाषा वापलल्याबद्दल ज्येष्ठ नेत्यावर कारवाई केली तशी कारवाई करण्याचं धाडस मोदी दाखवतील का ?  असा प्रश्न विचारण्यात आला आहे. त्यामुळे काँग्रेसने गुजरात निवडणुकीच्या तोंडावर अय्यर यांना निलंबित करुन डॅमेज कंट्रोल केले आहे की अय्यर यांचं वक्तव्य म्हणजे भाजपने केलेली खेळी होती आणि तीच त्यांच्यावर उलटवली आहे याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

COMMENTS