माजी पंतप्रधान मनमोहन सिंगांचं पंतप्रधान मोदींना पत्र, वाचा आहे तसं पत्र मराठीमध्ये

माजी पंतप्रधान मनमोहन सिंगांचं पंतप्रधान मोदींना पत्र, वाचा आहे तसं पत्र मराठीमध्ये

प्रति,
आदरणीय पंतप्रधान
श्री. नरेंद्र मोदी, भारत सरकार

स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी धादांत असत्य आणि खोटेपणाने रचलेल्या अफवांचा वापर साक्षात प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदी  यांनी करावा हे पाहून मी अतिशय दु:खी व व्यथित झालो आहे. गुजरातमधील पराभव आता सुस्पष्ट दिसत असल्यामुळे भीतीने ग्रासलेले प्रधानमंत्री सुचेल त्या पद्धतीने आणि मिळेल तो धागा पकडून, अगतिकतेने प्रतिपक्षावर वार करत सुटले आहेत. माजी पंतप्रधान, लष्कर प्रमुख आणि लोकशाहीमधील इतर संवैधानिक संस्थाची लोकांच्या मनातील प्रतिमा डागळण्याचे  जे अतृप्त इरादे मनात ठेऊन श्री. मोदी पुढे जात आहेत, त्यातून अतिशय अयोग्य पायंडे पडत आहेत, हे अतिशय दु:खाने आणि खेदाने मी नमूद करत आहे.

दहशतवादाचा मुकाबला करताना सतत बोटचेपे धोरण ज्या पक्षाने आणि पंतप्रधानांनी स्वीकारले आहे त्यांनी राष्ट्रवाद म्हणजे काय याबद्दल काँग्रेस पक्षास धडे देऊ नयेत.  गुरूदासपूर आणि उधमपूरध्ये प्रत्यक्ष दहशतवादी हल्यानंतरही आपण अगंतूक पाहुणा बनून पाकिस्तानला कोणीही आपणास आमंत्रण दिले नसताना गेलात, याची मी श्री.नरेंद्र मोदींना आठवण करून देऊ इच्छितो. पठाणकोटच्या हवाई तळावर  पाकिस्तानने हल्ला केला असतानाही आपण कुप्रसिद्ध अशा आयएसआय या संस्थेस  तिथे भेट देण्याचे निमंत्रण देण्यामागची नेमकी काय कारणे होती, याचे स्पष्टीकरण आपण  देशातील जनतेला द्यायला
हवं?

माझ्या सार्वजनिक जीवनातील सेवेचा पाच दशकांचा इतिहास प्रत्येकास ठाऊक आहे. त्याचा कोणीही व्यक्ती अगदी श्री. नरेंद्र मोदीही स्वत:च्या स्वार्थासाठी राजकीय जमीन सुपीक करण्यासाठी प्रश्न उपस्थित करू शकत नाहीत. मी आपल्या असत्य आरोपांचा स्पष्ट शब्दांत निषेध करतो. मणिशंकर अय्यर यांनी आयोजीत केलेल्या त्या रात्रीभोजन पंक्तीत गुजरात निवडणूकीचा विषय कोणासोबतही मी चर्चीलेला नाही. एवढेच नव्हे तर या भोजनास उपस्थित असलेल्यांपैकी कोणीही गुजरातबाबत चर्चा केलेली नाही.

ही चर्चा केवळ भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधाच्या अनुषंगाने होती. त्या वेळी जे. जे. प्रथितयश भारतीय लोकसेवक तथा पत्रकार उपस्थित होते त्यांच्या नावांची यादी या निवेदनासोबत दिली आहे. त्यांच्यापैकी कोणावरही आपण राष्ट्रद्रोही कृत्यात सामील असल्याचा आरोप करू शकत नाही.

पंतप्रधानांनी अशा अयोग्य व निरर्थक बाबींवर लक्ष केंद्रीत करण्यात आपली क्षमता व्यतित करण्यापेक्षा गंभीरतेने आपली प्रगल्भता प्रदर्शित करावी जी अशा सर्वोच्च पदावर आसनस्थ होण्यासाठी आवश्यक असते, अशी प्रामाणिक इच्छा मी व्यक्त करतो.

मी आशा करतो, आज श्री. मोदी ज्या पदावर विराजमान आहेत, त्या पदाची प्रतिष्ठा पुन्हा स्थापित करण्यासाठी आणि स्वत:च्या या दुर्विचाराबद्दल गंभिर होऊन राष्ट्रातील समस्त जनतेची क्षमा मागतील.

मनमोहन सिंग,
माजी प्रधानमंत्री,
भारतीय प्रजासत्ताक

 

COMMENTS