नवी दिल्ली – माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सर्जिकल स्ट्राइकवरुन मोदी सरकारवर टीका केली आहे.
‘युपीए सरकारच्या काळातही सर्जिकल स्ट्राइकही झाले होते, पण आम्ही मतांसाठी त्याचा वापर केला नाही’.
मोदी सरकार आर्थिक स्तरावरील अपयश लपवण्यासाठी लष्कराच्या शौर्याचा फायदा घेत असून हे लाजिरवाणं असल्याचं मनमोहन सिंग यांनी म्हटलं आहे.
तसेच भाजपाध्यक्ष अमित शाह आणि केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी मुंबई 26/11 दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत मनमोहन सिंग यांच्यावर निशाणा साधला होता. ‘2008 मध्ये झालेल्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर भारतदेखील लष्कर कारवाई करु शकत होता. युपीए सरकार लष्करी कारवाई करण्यास तयार नव्हतं या आरोपाशी मी सहमत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
तसेच त्यावेळी आम्ही पाकिस्तानला पूर्ण वेगळं पाडण्याचा आणि त्यांचा चेहरा जगासमोर उघड कऱण्याचा निर्णय घेतला होता. तसंच दहशतवाद्यांविरोधात निर्णायक कारवाई करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरुन दबाव आणण्याचाही भूमिका आम्ही घेतली होती 26/11 दहशतवादी हल्ल्यानंतर आमच्या सरकारने सागरी सुरक्षा मजबूत केली आणि राष्ट्रीय दहशतवादी विरोधी केंद्राची (एनसीटीसी) संकल्पना मांडली. पण गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यास विरोध केला होता असंही मनमोहन सिंग यांनी म्हटलं आहे.
COMMENTS