मुंबई – बुधवारी अहमदनगरमधील तरुणानं आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर आज पुन्हा एकदा धक्कादायक घटना घडली असून हर्षल सुरेश रवाते या 44 वर्षीय व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. हर्षल हा मुळचा औरंगाबादमधील पैठण येथील रहिवासी आहे.
दरम्यान हर्षलचं एक ओळखपत्र आमच्या हाती लागलं असून तो औरंगाबादमध्ये महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणात पॅरा लिगल स्वयंसेवक म्हणून काम करत होता. तसेच त्याने नोकरीच्या तणावाखाली आत्महत्या केली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
धर्मा पाटील या शेतक-याच्या आत्महत्येनंतर आणखी दोन घटना मंत्रालयात घडल्यामुळे राज्यभरात खळबळ माजली आहे. विरोधकांकडून याबाबत जोरदार टीका केली जात आहे. आता या आत्महत्यांच्या प्रकरणांवर आळा घालण्याचं आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारपुढे आहे.
COMMENTS