सांगली – जिल्ह्यातील साखर कारखाने तसेच दूधप्रक्रिया, मद्यनिर्मिती, शीतकेंद्रे आदी अनेक प्रक्रिया उद्योगांंकडून प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन होत आहे. कोणतीही प्रक्रिया न करता मोठ्या प्रमाणावर दूषित पाणी नैसर्गिक स्रोतात सोडले जात आहे. तसेच सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेने शहरात तयार होणारा जैवकचरा आणि घनकचरा यांविषयी असलेले सर्व नियम अन् कायदे धाब्यावर बसवले आहेत. त्यातून प्रचंड प्रमाणात प्रदूषण निर्माण झालेले आहे. असे अनेक वर्षे प्रदूषण होत असतांना प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्यांनी या सर्वांना नोटिसा देण्यापलीकडे कोणतीही कारवाई केलेली नाही. सध्या प्रदूषण नियंत्रण मंडळाचे काम केवळ नोटिसा बजावणे एवढेच राहिले आहे का ? प्रदूषण करणार्या बड्या कारखानदारांवर कारवाई कधी करणार ? असा प्रश्न हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक मनोज खाडये यांनी केले.
COMMENTS