योगी आदित्यनाथांच्या विरोधात मनसेची पोस्टरबाजी

योगी आदित्यनाथांच्या विरोधात मनसेची पोस्टरबाजी

मुंबईः उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे दोन दिवसीय मुंबईच्या दौऱ्यावर आले आहेत. मुंबईत आल्यानंतर त्यांनी बाॅलीवूड स्टार्स आणि उद्योजकांची भेट घेतली. योगी आदित्यनाथ यांच्या दौऱ्यावरुन राज्यातील राजकारण तापलं आहे. त्यात मनसेनेही उडी घेत पोस्टरबाजी करीत आदित्यनाथांवर टिका केली आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी मुंबई दौऱ्यावर आले असताना महाविकास आघाडीमधील नेत्यांकडून टिकाटिपणी केली जात आहे. त्यात आता मनसेनंही योगी आदित्यनाथ यांच्या दौऱ्यावरुन टीका केली आहे. योगी आदित्यनाथ वास्तव्यास असलेल्या मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांच्या या हॉटेलबाहेर मनसेकडून पोस्टरबाजी करण्यात आली आहे. योगी आदित्यनाथांचा ‘ठग’ असा उल्लेख करत मनसेनं निशाणा साधला आहे.

मनसेनं लावलेल्या पोस्टरवर ‘कहा राजा भोज और कहा गंगू तेली… कुठं महाराष्ट्राचं वैभव तर तुठे युपीचं दारिद्र्य… असे म्हटले आहे. तसंच, ‘भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी स्थापन केलेली चित्रपटसृष्टी, युपीला नेण्याचं मुंगेरीलालचं स्वप्न. अपयशी राज्यातील बेरोजगारी लपवण्यासाठी मुंबईतील उद्योग पळवण्यासाठी आलेला ठग,’ असे या पोस्टरवर लिहण्यात आले आहे.

COMMENTS