मंत्रालयाच्या प्रांगणात भ्रष्टाचार, मंत्र्यांनी दिली कबुली !

मंत्रालयाच्या प्रांगणात भ्रष्टाचार, मंत्र्यांनी दिली कबुली !

नागपूर – सरकारी कामांमध्ये अनेक ठिकाणी भ्रष्टाचाराचे आरोप होतात, काही ठिकाणी ते सिद्धही होतात. भ्रष्टाचारात अनेक वेळा नेते आणि अधिका-यांचं संगनमत असतं. आता तर भ्रष्टाचाराचं प्रकरण मंत्रालयाच्या प्रांगणात आलंय. मंत्रालयाच्या प्रांगणात फेवर ब्लॉक बसवण्याच्या कामात हा भ्रष्टाचार झालाय. फेवर ब्लॉक न बसवतात लाखो रुपयांची बिले उचलण्यात आली आहे. विधानसभेत विचारलेल्या लेखी उत्तर मंत्र्यांनी असा प्रकार झाल्याचं मान्यही केलं आहे.

आता रोज मंत्री, विरोधी आमदार आणि विरोधी पक्षनेते ज्या ठिकाणी ये- जा करतात त्या ठिकाणी चक्क फेवर ब्लॉक न बसवता त्याची बिले उचलली जातात. म्हणज्ये त्या अधिका-यांचं किती धाडस म्हणायला हवं ? अधिका-यांना कशाचीही भिती उतरली नाही असंच म्हणावं लागेल. मंत्रीमहोदयांनी याची  विधीमंडळात कबुली दिली. मात्र त्यांच्यावर कारवाई होणार का ? असा प्रश्न उपस्थित होतोय. की इतर अनेक प्रकराणासारखे हेही प्रकरण फक्त चौकशीचा फार्स करुन तिथेच दावले जाणार ?

COMMENTS