मंत्रालयासमोर आणखी एक धक्कादायक घटना, वृद्ध महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न !

मंत्रालयासमोर आणखी एक धक्कादायक घटना, वृद्ध महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न !

मुंबई – मंत्रालयासमोर आणखी एक धक्कादायक घटना घडली असून वृद्ध महिलेनं आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. सखुबाई विठ्ठल झाल्टे असं या वृद्ध महिलेचं नाव असून या महिलेने पत्र लिहून मंत्रालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला होता. या महिलेने जमीन बळकावल्याची तक्रार दिली होती. मुख्यमंत्र्यांकडे तक्रार देऊनही कारवाई होत नसल्याने हे कृत्य त्यांनी केलं असल्याची माहिती आहे. पोलिसांनी तात्काळ सदर महिलेला सेंट जॉर्ज रूग्णालयात दाखल केलं आहे. विष प्राशन केलेल्या वृद्ध महिलेची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

मंत्रालयासमध्ये काही दिवसांपूर्वीच धर्मा पाटील यांच्यासह दोघांनी आत्महत्या केली होती. त्यानंतर आता आणखी एक धक्कादायक घटना घडली असल्यामुळे सरकारवर विरोधकांककडून जोरादर टीका केली जात आहे.

 

COMMENTS