मंत्रालयात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न !

मंत्रालयात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न !

मुंबई – पुन्हा एकदा मंत्रालयात एका तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरुन या तरुणाने उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. परंतु सुदैवाने खाली लावलेल्या संरक्षक जाळ्यांमध्ये हा तरुण अडकला आणि त्याचे प्राण बचावले आहेत.आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली असून लक्ष्मण चव्हाण असे उडी मारणाऱ्या तरुणाचे नाव असल्याची माहिती आहे.

दरम्यान हा चरुण प्रजासत्ताक भारत पक्षाचा कार्यकर्ता असल्याची माहिती आहे. अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांच्या मदतीनं या तरुणाला जाळीवरुन सुरक्षित खाली उतरवण्यात आलं. सध्या त्याच्याकडे चौकशी केली जात आहे.  दरम्यान या तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न का केला याबाबत अद्याप नेमकी माहिती मिळाली नसून काही महिन्यांपूर्वीच मंत्रालयात विषप्राषन करून शेतकरी धर्मा पाटील यांनी आत्महत्या केली होती. हे  प्रकरण आता शांत होत असतानाच पुन्हा एकदा या तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

COMMENTS