मुंबई – मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या १६ टक्के आरक्षण दिल्यानंतर आता या दिशेने पुढील पाऊल टाकले आहे. आता मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासप्रवर्गासाठी आवश्यक असणारे जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.त्यासंदर्भात आज राज्य सरकारने शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. तसेच हे दोन्ही प्रमाणपत्र कसे असेल याचे नमुने दिले आहेत.
राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल येताच राज्य सरकारने हा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारत हिवाळी अधिवेशनात मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासप्रवर्ग तयार करून १६ टक्के आरक्षण देणारे विधेयक मंजूर केले आहे. आता मराठा समाजाला या प्रवर्गाचे फायदे मिळावेत आणि आगामी मेगा भरतीत सोईचे व्हावे म्हणून मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या प्रवर्गाचे जातीचे प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. आज राज्य सरकारने शासन निर्णय जारी करून मराठा समाजाला शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता देण्यात येणारी जात प्रमाणत्रे ग्राह्य धरली जावी असे आदेश काढले आहेत.
या शासन निर्णयासोबतच जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र कसे असेल त्याचा नमुना प्रसिध्द केला आहे. त्यानुसार आता मराठा समाजाला जात प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर या समाजाला जात प्रमाणपत्र देण्याचे आदेश जारी केल्याने राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेले आश्वासन तडीस नेल्याची चर्चा आह
COMMENTS