नवी मुंबई – विविध मागण्यांवर मराठा समाज आक्रमक झाला असून पुन्हा सरकारविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय मराठा समाजानं घेतला आहे. 19 फेब्रुवारी 2018 ला पुन्हा सरकारविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. पनवेलमध्ये घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एक मराठा लाख मराठा सरकारविरोधात रस्त्यावर उतरणार असल्याचं दिसत आहे.
शनिवारी झालेल्या बैठकीत राज्यभरातील मराठा बांधव उपस्थित होते. आरक्षण, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणे, अट्रोसिटी कायद्याचा गैरवापर थांबवण्यासाठी कायद्यात बदल यापैकी एकही मागणी सरकारनं मान्य केली नसल्यामुळे सरकारचा निषेध करत पुन्हा आंदोलन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.या बैठकीत मराठा समाजाची राज्यव्यापी समिती स्थापन करण्यात आली असून अर्थसंकल्पीय अधिवेनशन होऊ न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच 11 जानेवारी 2018 रोजी जळगावमध्ये पुढील राज्यव्यापी बैठक घेण्यात येणार आहे.
COMMENTS