मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण?

मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण?

मुंबई – मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीत घेण्यात आला असल्याची माहिती आहे. या समितीच्या मागील दोन दिवसात तीन बैठका झाल्या.त्यानंतर  उपसमितीने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिलं जावं या निर्णयावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती समोर आली आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणााठी मागासवगर्गीय आयोगाची स्थापना करण्यात आली. य आयोगाने मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशी भूमिका घेतली आहे. त्यानंतर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. आंदोलन करू नका जल्लोषाची तयारी करा असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
आरक्षणासंदर्भातले विधेयक सभागृहात मांडण्यात येणार आहे. यासंदर्भात आज विधीमंडळातही विोरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

COMMENTS