बाळासाहेब थोरातांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन

बाळासाहेब थोरातांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन

औरंगाबाद: औरंगाबादचे नामांतर करून संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला विरोध दर्शविणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात शनिवारी औरंगाबादमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी थोराताच्या फोटोला जोडेमारो आंदोलन केले.

औरंगाबादचे संभाजीनगर करावी, अशी मागणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली. या मागणीसाठी अनेक वर्षांपासून आंदोलने सुरू आहे. या मागणीने मागील काही दिवसांपासून जोर धऱला आहे. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नाव बदल हा आमचा (महाविकास आघाडी) कार्यक्रम नाही. नाव बदल आणि अशा प्रकारच्या गोष्टींना आमचा विरोध राहील, असं थोरात म्हणाले.

औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला विरोध दर्शविणारे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचाही मराठा आंदोलकांनी निषेध केला. आंदोलकांनी बाळासाहेब थोरात यांच्या प्रतिमेला जोडे मारत तो फाडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतले. यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करा, अशी मागणी केली.

COMMENTS