नवी दिल्ली – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. महाराष्ट्रात सुरु असलेलं आंदोलन आता दिल्लीपर्यंत पोहचलं आहे. मराठा आरक्षणाचा आवाज दिल्लीत घुमला असून नवीन महाराष्ट्र सदनात मराठा क्रांती मोर्चाने आंदोलन केलं आहे. यावेळी या मोर्चेक-यांनी राज्य आणि केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत मराठा आरक्षणाची मागणी केली आहे. या आंदोलनाला राज्यातील अनेक मराठा बांधवांसह मराठा क्रांती मोर्चाचे प्रतिनिधी प्रदीप पाटील आणि विशाल साळुंखे हे उपस्थित होते.
दरम्यान आरक्षणाच्या मागणीवरुन राज्यात ठिकठिकाणी मराठा समजाचं आंदोलन सुरु आहे. महाराष्ट्र बंद, मुंबई, ठाण्यामध्ये बंद पाळल्यानंतर आज मराठा क्रांतीच्या कार्यकर्त्यांनी दिल्ली गाठली आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदनात जाऊन या कार्यकर्त्यांनी एकच मिशन मराठा आरक्षण म्हणत जोरदार घोषणाबाजी केली आहे.
COMMENTS