अफवांवर विश्वास ठेऊ नका -मराठा क्रांती मोर्चा

अफवांवर विश्वास ठेऊ नका -मराठा क्रांती मोर्चा

मुंबई – मराठा समाजाच्या वतीने 10 जानेवारी रोजी महाराष्ट्र बंद अशा आशयाची एक पोस्ट गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  परंतु ही पोस्ट खरी नसून ती फक्त अफवा असल्याचं मराठा क्रांती मोर्चाकडून सांगण्यात आलं आहे. मराठा क्रांती मोर्चाकडून कोणताही बंद पुकारण्यात आला नसल्याचं मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाजाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे. यासोबतच अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहनी करण्यात आलं आहे.

१ जानेवारी रोजी झालेल्या हिंसाचाप्रकरणी एक मराठा भावाला आपला जीव गमवावा लागला. मराठा बांधवांवर अॅट्रॉसिटीसह इतर कलमांतर्गत गंभीर गुन्हे दाखल केले गेले आहेत. याच्या निषेधार्थ काही ठिकाणी स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन विभागीय बंद ठेवण्यात आले असून ‘महाराष्ट्र बंद’बाबत असा कुठलाही निर्णय झालेला नाही आणि असा कुठलाही बंद ठेवला जाणार नाही असं विनोद लक्ष्मण पोखरकर यांनी सांगितलं आहे. मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज हे समाजाचे व्यासपीठ आहे. सकल मराठा समाज मराठा क्रांती मोर्चाची कोणतीही अधिकृत बैठक झालेली नाही, आणि कोणीही मराठा सामाजाच्या नावावर मराठा क्रांती मोर्चा किंवा सकल मराठा समाजाने बंद पुकारलेला नाही असं समन्वयक विनोद लक्ष्मण पोखरकर यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS