मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ, 25 ते 30 जण पोलिसांच्या ताब्यात !

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ, 25 ते 30 जण पोलिसांच्या ताब्यात !

पुणे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पिंपरी-चिंचवडच्या दौ-यावर होते. त्यांच्या या दौ-यादरम्यान मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे.  पिंपरीतील क्रांतीवीर चाफेकर राष्ट्रीय संग्रहालयाच्या इमारतीतचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. याच ठिकाणी कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी काही कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला होता. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी मराठा क्रांती मोर्चाच्या 25 ते 30 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.

दरम्यान आरक्षणाच्या मागणीवरुन मराठा समाज आक्रमक झाला असून राज्यभरात मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनादरम्यान मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून अनेक ठिकाणी रास्तारोको आंदोलन सुरु आहे. जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली लागत नाही तोवर मेगा भरती रद्द करण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीनं करण्यात आली आहे.

COMMENTS