मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण, भाजप नेत्यांचा विधीमंडळाबाहेर जल्लोष !

मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण, भाजप नेत्यांचा विधीमंडळाबाहेर जल्लोष !

मुंबई – मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याची तरतूद विधेयकात करण्यात आली आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांसह भाजप नेत्यांनी विधीमंडळाबाहेर जल्लोष केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण संदर्भातील कृती अहवाल राज्याच्या विधिमंडळात सादर केला आहे. त्यानंतर आता याबाबतचे विधेयक मांडले जाणार आहे. कृती अहवालासोबत कायद्याची प्रतही देण्यात आली असून धनगर आरक्षणासंदर्भातही लवकरच पावले उचलली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. कृती अहवाल सादर केल्यानंतर विधानसभेतील सदस्यांनी अहवाल वाचनासाठी काही वेळ देण्याची मागणी केली आहे. याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. चर्चेनंतर मराठा आरक्षणासंदर्भात विधेयक सादर केले जाणार आहे.

दरम्यान या अहवालातून मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मिळेल, हे स्पष्ट झाले असून कृती अहवाल सादर केल्यानंतर धनगर आरक्षणाचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. धनगर आरक्षणासंदर्भातही उपसमिती नेमली जाईल आणि त्यानंतर एटीआर सादर करुन धनगर आरक्षणाचा मुद्दा निकाली काढला जाणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

आरक्षणातील महत्त्वाचे मुद्दे

1)सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घोषित करण्यात आलेला मराठा समाज संविधानातील अनुच्छेद १५(४), १६(४) मध्ये समाविष्ट केलेल्या आरक्षणाचे लाभ व फायदे मिळण्यास हक्कदार आहे.

2) शैक्षणिक संस्थांमध्ये मराठा समाजाला आरक्षण.

3)मराठा समाजातील उमेदवारांना राज्यातील लोकसेवांमधील नियुक्त्या व पदे यात अशा प्रवर्गातकरिता आरक्षणाची तरतूद

4)निवडणुकांच्या जागांकरिता आरक्षणाचा अंतर्भाव नसणार.

 

COMMENTS