मराठा आरक्षण – वैधानिक कार्यवाहीसाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन !

मराठा आरक्षण – वैधानिक कार्यवाहीसाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन !

मुंबई – मराठा आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाच्या शिफारशींवर वैधानिक कार्यवाही करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्याबाबतचा जीआर आज जारी करण्यात आला आहे. शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, सार्वजनिक उपक्रम बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, सहकार मंत्री सुभाष देशमुख, जलसंधारण मंत्री राम शिंदे, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा हे या  उपसमितीचे सदस्य आहेत तर सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सहसदस्य असल्याची माहिती आहे.

मागासवर्ग आयोगाचा अहवाल गेल्या १८ तारखेला झालेल्या राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत सादर करण्यात आला होता. मंत्रीमंडळानं अहवालाच्या खंड 3 मधल्या शिफारशी पूर्णतः स्वीकारून उपसमिती स्थापन करायला मान्यता दिली होती. मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय अंतिम असणार असून आवश्यक ती वैधानिक कार्यवाही करण्यात येणार आहे. यासंदर्भातला प्रस्ताव पुन्हा मंत्रिमंडळासमोर सादर करण्याची आवश्यकता भासणार नसल्याची देखील माहिती आहे. विचारविनिमय करण्यासाठी गरजेनुसार तज्ञ, विधिज्ञ आणि संबंधित अधिकाऱ्यांना निमंत्रित करण्याचे अधिकार या उपसमितीला देण्यात आले आहेत.

 

COMMENTS