औरंगाबाद – मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन महाराष्ट्रात पाळण्यात आलेल्या बंददरम्यान अनेक ठिकाणी तोडफोड करण्यात आली. औरंगाबादमधील वाळूंज एमआयडीसीमध्ये जोरदार तोडफोड करण्यात आली. परंतु या तोडफोडीचा मराठा मोर्चाशी काहीही संबंध नसून एमआयडीसी परिसरातील कंपन्यांमध्ये झालेल्या तोडफोडीची सीआयडी चौकशी करण्याची मागणी मराठा मोर्चा समन्वय समितीने केली आहे. या तोडफोडीचा आम्ही निषेध करतो. मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा या घटनेशी काहीही संबंध नसल्याचं मराठा मोर्चानं म्हटलं आहे.
दरम्यान मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते वेगवेगळया चौकात आंदोलनाला बसले होते. त्यामुळे दुसऱ्याच कोणीतीरी ही तोडफोड केली असून याप्रकरणाची सीआयडी चौकशी झाली पाहिजे अशी मागणी समन्वय समितीने केली आहे. आमचा मार्ग शांततेचा असून कुठल्याही प्रकारच्या हिंसाचाराला आमचं समर्थन नाही. वाळूंज एमआयडीसीमध्ये ९० टक्के मराठा समाज काम करतो याची आम्हाला कल्पना आहे. या तोडफोडीचा आम्ही निषेध करतो. आमच्या कार्यकर्त्यांना विनाकारण यामध्ये गोवण्यात येत असल्याचंही मराठा मोर्चानं म्हटलं आहे.
COMMENTS