मुंबई – एकीकडे राज्यभरात मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन राज्यभारत मराठा तरुणांचा असंतोष पहायला मिळतोय. त्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. तर दुसरीकडे राजकारण्यांची एकमेकांवर चिखलफेक सुरू आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक खासदार नारायण राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
शरद पवार 4 वेळा राज्याचे मुख्यमंत्री होते. तेंव्हा त्यांना मराठा समाजाला आरक्षण देता आलं नाही अशी टीका राणे यांनी केलं आहे. आता हे आंदोलन मराठा समाजाच्या हातात राहिलेलं नाही. निवडणुका डोळ्यापुढे ठेऊन राजकीय श्रेयासाठी हिंसा सुरु आहे असा आरोपही राणे यांनी केला. आंदोलनाची ठिकाणं तुम्ही पाहा मग तुम्हाला समजेल या मागे कोण आहे ते असंही राणे म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कुठल्याही घटनात्मक दुरुस्तीची गरज नाही. हा राज्यापुरता मर्यादित विषय आहे असंही ते म्हणाले.
शिवसेना आणि उद्धव ठाकरे हे कधीच मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाजूने नव्हते. केवळ पक्षाच्या आमदारांच्या दबावामुळे उद्धव ठाकरेंना पाठिंब्याची भूमिका घ्यावी लागतेय असा आरोपही नारायण राणे यांनी केला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मुद्दा आला की मग लगेचच आर्थिक निकषावर आरक्षण असावं असा विचार का पुढे येतो असंही राणे म्हणाले. एका मराठी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये राणे यांनी हे आरोप केले आहेत.
COMMENTS