पुणे – राज्य सरकारने जाहीर केलेले ईडब्ल्यूएस आरक्षण फक्त मराठा समाजासाठी नाही. यामध्ये ब्राह्मण, जैन, लिंगायत अशा सर्व जातींचा समावेश आहे. माझा वैयक्तिक विरोध नाही, पण एसईबीसीला धोका होऊ शकतो का, याची चिंता आहे. मराठा समाजाला बहुजन समाजापासून लांब ठेवलं जात आहे, असा आरोप खासदार संभाजीराजे यांनी केला. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
संभाजीराजे म्हणाले की, “मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांना सारथीची कल्पना दिली आहे. सविस्तपणे त्यांना हा विषय सांगितला आहे. शरद पवारांच्या वाढदिवशी शुभेच्छा देताना त्यांनाही सांगितलं. आज मी पुन्हा त्यांना सांगू इच्छितो…शरद पवारसाहेब छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचे पाईक आहेत. त्यामुळे सारथी संस्था वाचवायची असेल तर त्यांनी यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे. लक्ष घातलं पाहिजे”.
“पुरोगामी आणि शाहू महाराजांचे विचार जर जिवंत ठेवायचे असतील तर लक्ष घालणं गरजेचं आहे. अन्यथा गुंडाळून ही संस्था बंद करावी. उगाच शाहू महाराजांच्या नावे संस्था उभी करायची. बुडीत घालायचीच असेल तर बंदच करुन टाका. कशाला आपण शाहू, फुले, आंबेडकरांचं नाव घ्यायचं,” असा संतापही यावेळी त्यांनी व्यक्त केला.
COMMENTS