पुणे – आरक्षणाच्या मागणीवरुन मराठा समाजानं आक्रमक भूमिका घेतली असून २९ जूनला तुळजापूर येथे जागरण गोंधळ स्वरूपी पहिले आंदोलन करणार असल्याचा इशारा आज झालेल्या बैठकीत देण्यात आला आहे. २९ जून रोजी तुळजापूर येथे जागरण गोंधळ घालून पहिले आंदोलन करणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संजय सावंत यांनी दिली आहे. झोपेचं सोंग घेतलेल्या सरकारला जाग करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार असून यापुढे मराठा समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारला न सांगता गनिमीकावा स्वरूपात आंदोलन करण्यात येणार असून मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर मराठा समाजाचे असंख्य तरुण जाऊन कोणत्या क्षणी आंदोलन करतील याची तारीख जाहीर केली जाणार नसल्याचं सावंत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान इतर समाजाचे बांधव हे आमचे छोटे भाऊ असून त्यांना दिलेल्या आरक्षणाला धक्का लागू देणार नसल्याची भूमिकाही मराठा समाजानं घेतली आहे. तसेच याबाबत समाजामध्ये गैरसमज निर्माण पसरवले जात असून आमचं आरक्षण थांबल तरी चालेल पण दिलेल्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये ही आमची प्रमुख भूमिका असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबा पाटील यांनी दिली आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आबा पाटील,माणिकराव शिंदे,संतोष सूर्याराव,विवेकानंद बाबर,महेश डोंगरे,आदी मान्यवर उपस्थित होते.
COMMENTS