राज्यात 400 ठिकाणी मराठा नेत्यांच्या गाड्या अडवल्या, ‘या’ मराठा नेत्यांना घेतले ताब्यात !

राज्यात 400 ठिकाणी मराठा नेत्यांच्या गाड्या अडवल्या, ‘या’ मराठा नेत्यांना घेतले ताब्यात !

मुंबई – मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेसाठी मुंबईकडे येणा-या मराठा समाजाच्या राज्यभरात विविध ठिकाणी ४०० हून अधिक गाड्या पोलिसांनी अडवल्या आहेत. त्यामुळे पोलिसांची दडपशाही सुरू असल्याचा मराठा क्रांती मोर्चानं आरोप केला आहे. आज विधिमंडळावर मोर्चा काढण्यासाठी राज्यातून 400 हून अधिक गाड्या मुंबईकडे निघाल्या होत्या. परंतु मोर्चासाठी आंदोलक न पोहचल्यानं आझाद मैदानातील मंडप रिकामा राहिला आहे. तसेच मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक शांताराम कुंजीर कार्यकर्त्यांसह आझाद मैदानात ठाण मांडून आहेत.

सोलापूरचे समन्वयक माऊली पवार, नवी मुंबईचे अंकुश कदम आणि अहमदनगरचे संजय भोर पाटील यांना मुंबईच्या माटुंगा पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याची माहिती आहे. तसेच पुण्याचे धनंजय जाधव, राजेंद्र कोंडरे, अश्विनी खाडे, कैलास पठारे ,नाशिकचे करण गायकर, गणेश कदम,तुषार जगताप, कोल्हापूरचे वसंत मुळीक, इंद्रजित सावंत, दिलीप देसाई, या मराठा समाजाच्या समन्वयकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

दरम्यान सोलापूरल जिल्ह्यातील माढा येथील मराठा समाजाच्या गाड्या कर्जत फाटा इथं पोलिसांनी अडवल्या आहेत. त्यामुळे मुराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच पोलीस दडपशाही करत असल्याचा आरोपही या कार्यकर्त्यांनी केला आहे.

COMMENTS