बीड – मराठा आरक्षणासाठी परळी येथे 18 दिवसांपासून ठिय्या आंदोलन करणाऱ्या आपल्या सारख्या कार्यकर्त्यांवर आरोप करून बदनामी करणाऱ्या रुपाली पाटील यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मराठा ठोक मोर्चा समन्वयक आबासाहेब पाटील यांनी केली आहे. पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली आहे मात्र अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेली नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान नितेश राणे आणि रुपाली पाटील यांचे संभाषण असलेली एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने मराठा आंदोलकांमध्ये खळबळ उडाली होती, आबासाहेब पाटील यांनी याविरोधात पोलीस ठाणे गाठून त्या ठिकाणी तक्रार दाखल केली आहे,या ऑडिओ क्लिपमुळे आंदोलनात फूट पडल्याचे चित्र या ठिकाणी दिसून आले आहे. गेल्या सतरा दिवसापासून आपण परळी येथे आंदोलन करीत आहोत मात्र काही लोकांना या आंदोलनातून राजकीय स्वार्थ साधायचा आहे. त्यामुळे आपल्याला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या विरोधात आपण पोलीस तक्रार करणार असल्याची माहिती आबासाहेब पाटील यांनी दिली आहे.
तसेच आबासाहेब पाटील यांच्यावर आरोप करणारी नितेश राणे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे त्यामुळे सध्या आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. आपल्याला कोणीही चर्चेला बोलावले नव्हते आणि आपणही जाणार नव्हतो,त्यामुळे मला काही मिळावे यासाठी हे सगळे सुरू असल्याचे आरोप करणे हास्यास्पद आहे असेही पाटील यांनी म्हटलं आहे.
COMMENTS