औरंगाबाद – मराठवाड्यात सर्वच मतदारसंघात चुरशीची लढत झाली आहे. त्यामुळे निवडणुकीचे अंदाज वर्तवण तसं कठीण होऊन बसलं आहे. त्यातही मराठवाड्यातील 8 पैकी 6 मतदारसंघाचे अंदाज वर्तवणं तर महाकठीण झालं आहे. कोणीही ठामपणे या मतदारसंघात हा विजयी होईल असं सागंत नाही. दोन मतदारसंघ मात्र याला अपवाद आहेत. जालना मतदारसंघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान खासदार रावसाहेब दानवे हे पुन्हा विजयी होतील अशी शक्यता आहे. एवढचं नाही तर मराठवाड्यात सर्वाधिक मताधिक्यही रावसाहेब दानवे यांनाच मिळेल असा अंदाज आहे. तर परभणीच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर जिंकतील असा बहुतेकांचा अदांज आहे.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात कधी नव्हे एवढ चुरशीची चौरंगी लढत झाली आहे. तिथे शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांची जागा धोक्यात असल्याची चर्चा आहे. खैरै यांनीही भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी औरंगाबादमध्ये युती धर्म पाळला नाही. त्यांनी अपक्ष म्हणून लढणा-या जावयाला मदत केली असा आरोप केला आहे. त्यामुळे या चौरंगी लढतीमध्ये खैरच बाजी मारतात की अपक्ष म्हणून लढणारे हर्षवर्धन जाधव जिंकतात की या दोघांच्या वादात वंचितचे इम्तिआज जलिल बाजी मारतात ते पहावं लागेल. या सर्वांच्या वादात काँग्रेसचे सुभाष झांबड यांना लॉटरी लागते ते पहावं लागेल.
बीडमध्येही अत्यंत चुरशीची लढत झाली आहे. कोणताही उमेदवार 25 ते 30 हजार मतांपेक्षा कमी आघाडीने जिंकेल असं बोललं जातंय. नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांनाही भाजपच्या उमेदवाराने चांगलाच घाम फोडला. त्यामुळे नांदेडचं मतदान होईपर्यंत अशोकरावांना राज्यात इतरत्र प्रचारालाही जाता आलं नाही. हिंगोलीतला अंदाज वर्तवणं तर फारच कठिण आणि गुंतागुंतीचं झालंय. तर उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादीचं पारडं जड असलं तरी लढत खूपच घासून झाली आहे.
COMMENTS